(02112)222405 (02112)223635
  principal@tccollege.org

स्थापना १९६२

Anekant Education society's

Tuljaram Chaturchand College

of Arts, Science & Commerce, Baramati, Pune, MS, India.

Junior Section

Religious Minority Institute



स्थापना १९६१

Best College Award
Best Principal Award

Index Number- J-11.02.001
U-Dise No-27250211827

MHT-CET,  JEE,  NEET
Guidance Centre

C.A. Foundation
Competitive Exams

Foreign Languages
Spoken English Course

Faculty of Arts

Department of English


Department Profile

The English Department at Tuljaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati, established in 1977, comprises seven dedicated teachers committed to nurturing a passion for language, literature, and critical thinking. With a focus on academic excellence, our curriculum covers language skills, literature analysis, and creative writing, tailored to meet diverse student needs. Through innovative teaching methods, interactive activities, and literary events, we foster an engaging and supportive learning environment where students receive personalized attention and guidance to excel in English language and literature. Extracurricular opportunities like debate clubs and creative writing workshops further enhance students' language skills and creative talents, preparing them to thrive in a globally connected world.

Vision And Mission

Vision

Empower rural students with proficiency in English, fostering holistic development and global citizenship. Our Junior college English Department envisions a dynamic learning environment that nurtures creativity, critical thinking, and communication skills, enabling students to thrive in the interconnected world.

Mission

Dedicated to academic excellence, our mission is to provide inclusive and quality English education in a culturally rich rural setting. We aim to cultivate a love for literature, language, and effective communication, equipping students with the tools to navigate diverse academic and professional landscapes. Through innovative teaching methods, we aspire to bridge the urban-rural educational divide and empower every student to achieve their fullest potential.

Key Features

Interactive Teaching Methods:

Employ innovative and interactive teaching methods, including multimedia resources, group activities, and real-world applications, to engage students actively in the learning process and enhance their understanding of English language and literature.

Supportive Learning Environment:

Establish a supportive learning environment that encourages students to express themselves freely, fostering confidence and effective communication skills. Implement student-centered approaches to address individual learning styles and needs.

Professional Development for Educators:

Prioritize continuous professional development for English educators, equipping them with the latest teaching methodologies, technological tools, and strategies to create a dynamic and impactful learning experience for students in the higher secondary school English department.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Smt. K.N. Doshi Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed
Shri. K.H. Gaikwad Teacher M.A., B.Ed, M.Phil
Shri. Y.H. Sonna Teacher M.A., B.Ed
Mrs. S.A. Mangudkar Teacher M.A., M.Ed
Mrs. S.Y. Chandgude Teacher M.A., B.Ed, M.Phil
Mrs. P.M. Dalavi Teacher M.A., B.Ed
Miss. H.B. Bhosale Teacher M.A., B.Ed
Mrs. M.R. Waghmare Teacher M.A., M.Ed


Department of Marathi


Department Profile

कविवर्य मोरोपंत आणि श्रीधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन अशा बारामती नगरीत अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक कार्यात भरीव असे योगदान देत आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक, नामांकित कवी व लेखक यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे विद्यार्थी लिहिते होतात, वाचते होतात आणि अभिव्यक्त होतात. तसेच विद्यार्थी स्वलिखित साहित्य निर्मितीकडे वळतात आणि दर्जेदार अशा साहित्य निर्मितीतून, कलेतून व वक्तृत्वातून आपला आविष्कार सादर करतात.

Vision And Mission

Vision
  • लेखन, वाचन, भाषण, संभाषण व गटचर्चा ही भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची (बातमी, अहवाल, सूत्रसंचालन, वृत्तलेख, मुद्रितशोधन, इत्यादी) रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करणे.
  • मराठी भाषेचा व तिच्या बोलीचा व्यवहारात अनुरूप उपयोग करून भाषेचे व बोलीचे संवर्धन करणे.
Mission
  • विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्याद्वारे व्यक्त होण्यास प्रेरित करणे.
  • विद्यार्थ्यांना मराठी साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा देणे.
  • भाषण व संभाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा बाणविणे.
  • राष्ट्र उभारणीसाठी सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय मूल्यांचे भान असणारा सुसंस्कृत व जबाबदार असा नागरिक निर्माण करणे.

Key Features

  • शैक्षणिक प्रशासन – (समन्वयक, कर्मवीर जयंती समिती -कार्यवाह)
  • मराठी वाड्.मय मंडळ
  • पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील संयुक्त जयंती समिती
  • कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धा
  • रेडिओ जॉकी (वसुंधरा वाहिनी)
  • सूत्रसंचालन
  • अनेकान्त आविष्कार

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. S.P.Shende Teacher (Subject Incharge)
Arts & Commerce Co-ordinator
M.A., B.Ed
Shri. B.N.Kumbhar Teacher M.A., B.Ed
Shri. R.R.More Teacher M.A., B.Ed
Mrs. S.A.Kadam Teacher M.A., B.Ed
Mrs. M.G.Zurunge Teacher M.A., B.Ed, M.Phil


Department of Hindi

Department Profile

अनेकान्त एज्युकेशन सोसाइटी द्वारा संचालित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय के कनिष्ठ विभाग की स्थापना सन 1976 में हुई ।इसी वर्ष से कनिष्ठ विभाग में कला ,वाणिज्य और शास्त्र शाखा के अंतर्गत विभिन्न विषयों को पढ़ाने की शुरुआत की गई। हिंदी विषय पढ़ाने की शुरुआत सन 1976 से शुरू हुई ।तब से हिंदी विषय निरंतर एक-एक पदान करके आगे बढ़ रहा है। हिंदी भारत की राष्ट्रभाषा हैं और इस भाषा के प्रचार-प्रसार के साथ-साथ छात्रों में रुचि बढ़ाने हेतु हिंदी काव्य वाचन प्रतियोगिता ,हिंदी दिवस समारोह ,विशेषज्ञ मार्गदर्शकों के व्याख्यानों का आयोजन किया जाता है| आज महाविद्यालय के छात्र अलग-अलग पदों पर कार्यरत हैं।

Vision And Mission

Vision
  • शिक्षा के द्वारा ज्ञान वृद्धि करना साथ ही मानवीय गुणों का सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ,राजनीतिक एवं आर्थिक दृष्टि से विकास करना ।
  • हिंदी को विश्व स्तर पर बढ़ावा देना ,सांस्कृतिक विकास को प्रोत्साहित करने की दिशा देना।
  • हिंदी भाषा और साहित्य को समाज परिवर्तन के स्थान तक पहुँचाना।
  • भाषा के प्रचार-प्रसार को बढ़ावा देना और भाषा को आर्थिक और सामाजिक क्षेत्र में अग्रणी बनाना।
Mission
  • हिंदी साहित्य द्वारा मानवीय मूल्यों का विकास करना ।
  • हिंदी भाषा और साहित्य के माध्यम से देश के समुदाय और जन-जन को जोड़ना।
  • भाषा ,साहित्य और सांस्कृतिक विकास को बढ़ावा देना।
  • हिंदी भाषा से संबंधित कार्यों को प्रोत्साहित करना।

Key Features

  • तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय के कनिष्ठ विभाग में यह विभाग क्रियाशील हैं |
  • विभाग से उत्तीर्ण छात्र विभिन्न क्षेत्रों में कार्य कर रहे हैं |
  • व्यावहारिक हिंदी से रोजगार के लिए मार्गदर्शन|

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. K.R. Bhosale Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed , M.Phil


Department of Geography

Department Profile

भूगोल विभाग हे एक गतिमान आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक घटक आहे जे शिक्षण, संशोधन आणि सामुदायिक सहभागाद्वारे पृथ्वी विज्ञान प्रगत करण्यासाठी वचनबद्ध आहे. 1977 मध्ये स्थापन झालेल्या, आमच्या विभागाचा भूगोलमधील ज्ञानाच्या सीमा पार करण्याचा समृद्ध इतिहास आहे.

भूगोल विभागाची प्राथमिकता नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास , कौशल्य आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या परिचयातून साध्य करीत असतो.

जिओ सर्वे ॲप,रिमोट सेन्सिंग, जीआयएस, डीजीपीएस आणि ड्रोन सर्वेक्षण यासारख्या भूगोलाच्या विविध पैलूंचा समावेश करणारे सेमिनार, कार्यशाळा आणि हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आमचा विभाग सक्रियपणे व्यस्त आहे. आम्हाला आमच्या नेचर क्लबचा अभिमान आहे, जे आमचे उपक्रम महाविद्यालयाच्या पलीकडे आणि ग्रामीण भागात विस्तारित करतात. शिवाय, आम्ही आमच्या वेलफेअर सेल आणि करिअर मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना समर्पित समर्थन देऊ करतो, विशेषत: भूगोलच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले.

हे नमूद करण्यासारखे आहे की आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्ट पदे भूषवली आहेत.

भूगोल विभाग अशा भविष्याची कल्पना करतो जिथे भूगोल हा आपल्या जगाच्या महत्त्वाच्या आव्हानांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी सामना करण्याचा एक आधारशिला आहे. अधिक शाश्वत, न्याय्य आणि लवचिक ग्रहासाठी योगदान देऊन भौगोलिक संशोधन, शिक्षण आणि समुदाय प्रतिबद्धता यामध्ये जागतिक नेता बनण्याची आमची इच्छा आहे.

या दृष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी, आम्ही अध्यापन, संशोधन आणि समुदाय सेवेमध्ये उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आम्हाच्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, समीक्षक विचार आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सहाय्यक आणि सर्वसमावेशक शिक्षण वातावरणाचे पालनपोषण करत राहू. आमचे संशोधन सकारात्मक बदल घडवून आणेल आणि समुदायांसोबत आमची प्रतिबद्धता अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करेल.

Vision And Mission

जागतिक महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भौगोलिक विज्ञानाच्या एकात्मिक स्वरूपाचा उपयोग करून मानवी आणि नैसर्गिक प्रणाली, शहरी आणि ग्रामीण समस्या आणि भौगोलिक माहिती विज्ञान यांच्या शैक्षणिक, आणि संशोधन दिशानिर्देशांच्या विकासाचे नेतृत्व करणे.

  • भूगोल विभागाचे ध्येय त्यांच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक अनुभव प्रदान करणे आणि मौल्यवान प्रकाशने तयार करणारे महत्त्वपूर्ण संशोधन करणे हे आहे. शैक्षणिक स्वातंत्र्य आणि कल्पनांच्या विविधतेच्या चौकटीत उत्कृष्ट अध्यापन आणि अभ्यासपूर्ण क्रियाकलांसाठी विभाग वचनबद्ध आहे. भूगोल विभाग ज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि स्थानिक ते जागतिक स्तरावर आपल्या समुदायांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे.
  • ज्ञान आणि कौशल्य मानवी मूल्य आणि एका चांगल्या जगासाठी सहानुभूती एकत्रित करून मानवी संसाधन विकसित करणे.
  • अध्ययवत ज्ञान आणि मानव जातीच्या शाश्वत विकासासाठी रहस्यमय मातृभूमी समजून घेणे.
  • भूगोलाचे दोन प्रमुख दृष्टिकोन म्हणजे अवकाशीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोन हे ऐतिहासिक आणि आर्थिक दृष्टिकोन आणि पूरक आहेत.
  • उच्च दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्व पात्र साधकांना व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणाची संधी प्रदान करणे.

Key Features

  • अनुभवी शिक्षक तज्ञ.
  • क्षेत्रभेट व अभ्यास सहल.
  • संशोधन वृत्ती रुजवणे.
  • सुसज्ज प्रयोगशाळा.
  • जीआयएस,जीपीएस, आय आर एस उपक्रम.
  • शैक्षणिक विषय उपक्रम.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. S.S.Sakhare Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed
Shri. S.L.Khomane Teacher M.A., B.Ed , M.Phil, NET


Department Of History

Department Profile

इतिहास विषयाच्या माध्यमातून मानवी विकासाची राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वाटचाल सुसूत्रपणे उलगडता येते. विविध कालखंडातील विविध घटनांचा अभ्यास या विषयाच्या माध्यमातून करता येतो. तसेच इतिहासाच्या अध्ययनाने व्यक्तीच्या भावी आयुष्यातील ध्येय साकारण्याच्या मार्गावरील वाटचालीला एक निश्चित अशी दिशा मिळते. इतिहासाचा मुख्य आधार म्हणजे विशिष्ट कालखंडातील अवशेष व घटनास्थळ जे कोणते ना कोणत्या स्वरूपात सापडतात.

कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत विद्यार्थी केंद्रभागी मानून त्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. वर्षभर थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी व इतर ऐतिहासिक दिनविशेष साजरी केले जातात. तसेच विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळ व घटनांचा प्रत्यक्ष परिचय व्हावा म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते की ज्याद्वारे विद्यार्थी ऐतिहासिक स्थळांची अथवा घटनेची स्वानुभुती घेईल त्यातून त्याचे शिक्षण आनंददायी व सुलभ होईल हे पाहिले जाते. इतिहास विभागामार्फत तज्ञ मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो.

आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे बोधवाक्य घेऊन विद्यार्थ्यास शिक्षण कार्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण विभागामार्फत केले जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावा म्हणून त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा बद्दल जाणीव जागृती निर्माण करून एक सक्षम नागरिक घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यास तयार करण्याची कार्य इतिहास विभागाकडून केले जाते.

Vision And Mission

Vision
  • इतिहास विषय अधिक रंजक ज्ञानदायी व ज्ञान रचनेला पूरक बनविणे.
  • विद्यार्थ्यांमधील ज्ञाननिर्मितीच्या क्षमतांचे पोषण करणे.
  • इतिहास विषयाची सैद्धांतिक पातळीवर आवड निर्माण करणे.
  • माहितीचे विश्लेषण - संश्लेषण करून विषयाचे सखोल आकलन करून घेण्याची पुरेशी क्षमता विकसित करणे.
  • ऐतिहासिक संदर्भ ठळकपणे स्पष्ट व्हावेत याकडे विशेष लक्ष पुरवणे.
  • इतिहासा संबंधी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन रुजवणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्मिती व रुची निर्माण करून स्वयंस्फूर्तीने विषयाचे अध्ययन करण्याची क्षमता निर्माण करणे.
  • क्यू आर कोड ,रंगीत चित्रे ,नकाशे व इतर शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून इतिहास विषयाला रंजक बनविणे.

Key Features

  • तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
  • स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन.
  • अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा वापर.
  • इतिहासातील विविध घटकांवर चर्चासत्रे व परिसंवाद.
  • बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची दीर्घ परंपरा.
  • ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन.
  • ऐतिहासिक दिनविशेष साजरीकरण.
  • तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचे आयोजन.
  • विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांचे आयोजन.
  • भव्य व सुसज्ज इतिहास खोली.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. P.S.Ovekar Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed B.Ed (Phy- Edu)
Shri. U.K.Kalantre Teacher M.A., B.Ed


Department Of Political Science

Department Profile

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये इ.स. 1977 मध्ये राज्यशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली. राज्यशास्त्र विषय हा इयत्ता 11 वी इयत्ता 12 वी कला शाखेमध्ये शिकविला जातो. राज्यशास्त्र विभागामध्ये साधारणपणे विधिमंडळ, भारतीय संसद, राज्य, राष्ट्र, स्वातंत्र्य, समता, न्याय भारतीय संविधान, आंतरराष्ट्रीय संबंध अशा वेगवेगळ्या विषयाचा l घटकांचा समावेश केला जातो. अभ्यास केला जातो. राज्यशास्त्र विभागालापूर्वी पासूनच व्यासंगी शिक्षकांची वैभवशाली परंपरा राहिलेली आहे. विद्यार्थ्याला केंद्र बिंदू मानून ज्ञानार्जनाचे काम केले जाते. विद्यार्थ्याला राज्यशास्त्र विषयाचे अधिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवी व तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जाते. राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या हक्कांविषयी तसेच कर्तव्यांविषयी जाणीव निर्माण झाली जाते. राज्यशास्त्र विभागाची प्रगती होण्यामध्ये संस्थेचे फार मोठे योगदान आहे.

Vision And Mission

  • राज्यशास्त्र विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राजकीय घडमोडींची जाणीव करून देणे.
  • लोकशाही, हुकूमशाही, राजेशाही यासारख्या शासनाच्या विविध प्रकारांचा परिचय करून देणे
  • भारतीय संसद्, विधिमंडळ निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या घटकांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.
  • उदारमतवाद, मार्क्सवाद, अशा वेगवेगळ्या विचारधारा आणि सिद्धानाचे परीक्षण करणे.
  • मतदान करणे तसेच राजकीय प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मानवतावादी दृष्टीकोन निर्माण करणे
  • विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे
  • विद्यार्थ्याच्या मनामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण
  • विद्यार्थ्याच्या मनामध्ये वैश्विक भावना निर्माण करणे
  • विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठीची तयारी करून घेणे.

Key Features

  • तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
  • स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन
  • एच एस सी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा
  • शैक्षणिक सहलींचे आयोजन
  • बोर्ड परीक्षेसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
  • आद्ययावत नोट्स
  • प्रशस्त वर्गखोल्या
  • संविधान दिन आयोजन
  • अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत
  • विद्यार्थ्यांना भारतीय संविधान व राजकीय व्यवस्थेबाबत मार्गदर्शन

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. F.A. Pathan Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed
Mrs. P.B.Saykar Teacher M.A., B.Ed


Department of Psychology

Department Profile

तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र हा विषय इ.स. सन १९७७ साली सुरू करण्यात आला आहे. हा विषय इयत्ता ११ वी.,१२ वी कला शाखेमध्ये शिकविला जातो.
मानसशास्त्र या विषयात मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. मानवाला येणाऱ्या समस्यांचे निवारण केले जाते विद्यार्थी हा सर्व मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. इयत्ता अकरावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयातील तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान दिले जाते. तसेच विषयातील भविष्यात करिअरच्या दृष्टीने कोणकोणत्या संधी आहेत त्या सांगितल्या जातात व मतिमंद अनाथाश्रम वृद्धाश्रम यासारख्या संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक नैतिकता निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थी त्याच्या आयुष्यात मानसिक दृष्ट्या सक्षम कसा राहील व ताणतणाव विरहित जीवन कशा पद्धतीने जगावे किंवा आलेल्या ताण-तणावावर कशाप्रकारे मात करायची आणि त्या प्रसंगातून कशा पद्धतीने बाहेर पडायचं हे विद्यार्थ्यास सांगितले जाते. इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गातील मुले मुली हे खऱ्या अर्थाने किशोर अवस्थेत असतात. त्या संदर्भात त्यांच्या समस्या लक्षात घेऊन .योग्य ती माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते.

Vision And Mission

Vision

मानसशास्त्र शिक्षण संशोधन आणि सराव मध्ये उत्कृष्टतेचे एक अग्रगण्य केंद्र बनणे आणि मानवी मन आणि वर्तनाबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी वचनबद्ध

Mission
  • आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक विचार आणि संशोधन कौशल्य वाढविण्यासाठी मानसशास्त्रातील उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणे.
  • मानसशास्त्रीय क्षेत्रातील ज्ञानाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या विविध क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन करणे.
  • पुराव्यावर आधारित मनोवैज्ञानिक हस्तक्षेपाद्वारे व्यक्ती आणि समुदायांचे कल्याण आणि मानसिक आरोग्य वाढविणे.
  • मानसशास्त्राशी संबंधित बाबींमध्ये तज्ञ संशोधने आणि समर्थन प्रदान करून समुदयांमध्ये व्यस्त राहणे आणि त्यांची सेवा करणे.
  • समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून मानसशास्त्र विभागाची विशिष्ट दृष्टी आणि ध्येय ठेवणे.

Key Features

Key Features
  • सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वैयक्तिक कौटुंबिक समस्यांचे समुपदेशन केले जाते.
  • विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सातत्याने त्यांच्याशी संवाद केला जातो.
  • स्व-प्रेरणा, स्वभाव व स्व-प्रतिष्ठा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाते.
  • किशोर अवस्थेतील समस्या विषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाते.
  • मानसशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या जजातात(उदा- मतिमंद शाळा, अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम) यासारख्या स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भूमिका यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.
  • विद्यार्थ्यांना समाजामध्ये मानसिक दृष्ट्या सक्षम राहून समाजातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. V.M.More Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed


Department of Economics

Department Profile

अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचलित तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाची स्थापना १९७७ साली झाली. या वर्षीपासून कनिष्ठ विभागात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेअंतर्गत विविध विषयांचे अध्यापन सुरू झाले. 1977 पासून अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन सुरू झाले. तेव्हापासून अर्थशास्त्र विषय सातत्याने प्रगती करत आहे. अर्थशास्त्र हा विषय जागतिक स्तरावर आहे, अर्थशास्त्र मॉडेल स्पर्धा, अर्थशास्त्राचे अंदाजपत्रक, तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने इत्यादी विद्यार्थ्यांमध्ये रस वाढवण्यासाठी आयोजित केले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून आज महाविद्यालयातील विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. संस्थेच्या योगदानामुळे विभाग उत्तरोत्तर प्रगती करत आहे.

Vision And Mission

Vision

शिक्षणाद्वारे ज्ञान वाढवणे तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गुण विकसित करणे.

आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी.

Mission
  • अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मानवी ज्ञान विकसित करणे.
  • अर्थशास्त्राच्या माध्यमातून देशातील समाज आणि लोकांना जोडणे.
  • आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी.
  • जागतिक अर्थशास्त्राशी संबंधित कामांना प्रोत्साहन.

Key Features

  • विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे.
  • अर्थशास्त्रीय प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे.
  • जागतिक अर्थशास्त्रीय अभ्यास ,स्वरूप ओळख करुन देणे.
  • अर्थशास्त्रातील नवनवीन संकल्पना जाणून घेणे.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. V.P.Dudhe Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed
Shri. S.G.Karande Teacher M.A., B.Ed
Mrs. S.V.Bankar Teacher M.A., B.Ed


Defence Studies

Department Profile

संरक्षणशास्त्र हा विषय १९६३ साली Military Science या नावाने पदवी अभ्यासक्रमामध्ये सुरू झाला. कारण १९६२ साली भारत-चीन युद्ध झाले आणि यामध्ये भारताचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेची जाणीव भारत सरकारला झाली. म्हणून देशाची बहिर्गत आणि अंतर्गत सुरक्षितता सांभाळली गेली तरच देशाचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडत्व किंवा राष्ट्रीय मूल्ये अबाधित राहतील आणि एकूणच भारताचे अस्तित्व टिकेल. यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रीय सुरक्षा याबद्दलची जाणीव ही शिक्षणाच्या माध्यमातूनच करता येईल या हेतूने भारत सरकारने Military Science हा विषय सुरू केला. पुढे १९८४ साली Military Science चे Defence Studies असे नामकरण केले. आपल्या अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये इ. ११ वी व १२ वी कला शाखेत १९७७ साली संरक्षणशास्त्र हा विषय सुरू झाला. संरक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमांमधून भारताच्या बहिर्गत आणि अंतर्गत सुरक्षा, सांभाळण्याची जबाबदारी भारतीय सशस्त्र सेनादलांवरती आहे आणि यासाठी त्या सेनादलांना लागणारी शस्त्रास्त्रे , दारुगोळा इत्यादी बद्दलची माहिती या संरक्षणशास्त्र विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्ग आणि समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी मदत होत आहे.

Vision And Mission

Vision

संरक्षण , सामरिक नीती , राष्ट्रीय सुरक्षा , आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता सशस्त्र सेनादले संबंधित क्षेत्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणारे विद्वान शास्त्रज्ञ संशोधक तयार करणे.

Mission

शैक्षणिक गुणवत्ता - अंतर्विद्याशाखीय दृष्टिकोनातून आणि सर्वसमावेशक अभ्यासक्रम यामधून संरक्षण शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या सिद्धांत आणि धोरणात्मक अभ्यासाची सखोल माहिती देऊन सक्षम बनविणे.

Key Features

नवोपक्रम -

संरक्षण शास्त्र विषयाच्या माध्यमातून देशाच्या विकसित क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी व तसेच उदयोन्मुख सुरक्षा विषयक धोके व आव्हाने ही बहिर्गत आणि अंतर्गत या दोन्ही आघाड्यांवर हाताळण्यासाठी अभ्यासक्रम सतत अद्ययावत करणे.

सखोल विश्लेषण -

संरक्षणशास्त्र या विषयांमध्ये बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आहे यामध्ये राज्यशास्त्र , इतिहास , भूगोल , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , आंतरराष्ट्रीय संबंध अशा स्वरूपाच्या विषयांना संरक्षणशास्त्र हा विषय स्पर्श करत असून यामधून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे , माहितीचे सखोल विश्लेषण होत आहे.

आकलन -

लष्करी इतिहास म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचा अभ्यास नव्हे. तर त्यातील विविध प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी लष्करी इतिहासाला भू-राजनितीशी जोडण्यासाठी हे गरजेचे आहे आणि हे संरक्षण शास्त्र या विषयांमधून पूर्ण होते.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. N.V.Khomane Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed , SET


Sociology

Department Profile

विभागाची माहिती (DEPARTMENT PROFILE ) :- अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय कनिष्ठ विभागाची स्थापना सन 1977 मध्ये झाली. कला शाखेमध्ये अनेक वेगवेगळे विषय शिकवले जातात. अनेक वेगवेगळी सामाजिक शास्त्रे शिकविली जातात. त्याचबरोबर समाजशास्त्र हा विषय देखील शिकवला जातो. समाजशास्त्र विभागामार्फत अनेक तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना अधिक प्रयोगात्मक शिक्षण आणि शोध क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो.

Vision And Mission

Vision

समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे.यामध्ये सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश होतो. समाज पाळत असलेले रीती रिवाज मानवी संरचना व्यवहार विभाजन आणि संबंध यांचे अध्ययन केले जाते. तसेच समाजातील विविध समस्यांचे अध्ययन करणे, समाजातील असमानता न्याय आणि सामाजिक अधिकारांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांचे समाजातील सहभाग वाढवणे, तसेच अध्ययन करण्याचे क्षमता विकसित करने. समाजशास्त्राच्या अध्ययनाने समाजातील समस्यांचे समाधान करण्याच्या दिशेने नेतृत्व करण्यास सक्षम बनवणे, विद्यार्थ्यांचा एक सामाजिक दृष्टिकोन विकसित करणे, सामाजिक समस्यांच्या समाधानासाठी समर्थ आणि समृद्ध समाज तयार करण्याच्या प्रक्रियेत सहाय्य करणे.

Mission

विद्यार्थ्यांना समाजासाठी चांगले नागरिक बनवणे. त्यांचा सर्वांगीण विकास करणे मुलींचे सक्षमीकरण करणे. सामाजिक समस्यांवर जागृती निर्माण करणे. मानवी मूल्य रुजवणे आणि सामाजिक समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे. आणि व्यक्तिमत्व विकास करणे. सामाजिक दृष्ट्या सक्रिय नागरिकांची निर्मिती करणे.

Key Features

  • समाजशास्त्र विषयाचे वैशिष्ट्ये प्रायोगिक पुरावे आणि तार्किक तर्क वापरून सामाजिक घटनांचे पद्धतशीर आणि संघटित स्पष्टीकरण प्रदान करणे होय.
  • समाजशास्त्रीय सिद्धांत मोठ्या प्रमाणात सामाजिक संरचना आणि संस्थांवर लक्ष केंद्रित करून सूक्ष्म स्तराचा दृष्टीकोन घेऊ शकतात, आणि वैयक्तिक परस्परसंवाद आणि वर्तनाचे परीक्षण करतात.
  • समाजशास्त्र सामाजिक समस्यांवर गंभीर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते, आणि त्यावर उपाय शोधण्यास प्रवृत्त करते.
  • आंतरविद्याशाखीय समाजशास्त्राचा मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर प्रभाव पडतो.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Mrs. V.B.Pol Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed


Philosophy And Logic

Department Profile

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आराखड्या नुसार महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेल्या अभ्यासक्रमाचे नवीन स्वरुप आणि त्याचे उद्दिष्ट लक्षात घेता ध्येयात्मक दृष्टीकोनातून महाविद्यालयाने 2021 पासून इयत्ता 11 वी व 12 वी करीता तत्त्वज्ञान (Philosophy) व तर्कशास्त्र (Logic) या विषयांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा तयार झालेला आहे.

Vision And Mission

  • तार्किक विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम
  • विज्ञानाधिष्ठित कल
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्व स्पर्धांपरीक्षा व विकासामध्ये कस लागावा
  • रचनात्मक कल्पनाशक्ती
  • नैतिक बांधिलकी आणि मूल्य
  • सर्वांगीण उन्नती
  • सर्वांगीण विकास
  • तणावमुक्त व सहजीवनशैलीचा पुरस्कार करण्यास उपयुक्त आहे.
  • मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
  • भक्कम गुणवत्ता प्राप्तीसाठी
  • वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोरच चिकित्सक वृत्ती
  • दूरदृष्टी •आत्मनिर्भरता • संशोधन वृत्ती • स्वयंअध्ययन •स्वयंशिस्त
  • स्वयंनिर्णय क्षमता इत्यादी विकास तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयाद्वारे होऊ शकतो.
  • अभ्यासूवृत्ती व संशोधन चिकित्सक विश्लेषण
  • तार्किक वैचारिक क्षमता अशा मूळ प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हाव्यात, उज्ज्वल सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी, भारताच्या भवितव्यासाठी, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक वारसा जतन व्हावा म्हणून आपल्या महाविद्यालयाने तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र या विषयांचा नव्याने अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव केलेला आहे.

Key Features

  • भक्कम गुणवत्ता प्राप्ती.
  • समाजाला चालना देणारे तंत्रज्ञान आणि आविष्कार तयार करण्यासाठी उपयुक्त.
  • दैनंदिन जीवनात गणित, विज्ञानापासून व्यवसायापर्यंत आधोरेखित करण्यासाठी समर्पित.
  • क्षेत्र निवडीची भक्कम निर्णय क्षमता विकसित.
  • सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तार्किक क्षमता विकसित.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Mrs. S.D.Shinde Teacher (Subject Incharge) M.A., B.Ed


Physical Education


Department Profile

The Department of Physical Education was established in 1977 and now Prof. Ashok Hanumant Deokar is working as subject head. The college administration has provided 17 acres of land for the physical education department.

In 1979 we have constructed gymkhana building. A spacious playground with a 400 meter running track was constructed with government grants and investment from the society. Volleyball Court, Basketball Court, Netball Court, Korfball Court, Targetball Court, Football Ground, Kabaddi and Kho-Kho Grounds have been constructed.

A separate gymnasium has been constructed through the grant of the society. An office, a store room and two halls were also constructed in the second building.

A walled compound has been built around the playground and trees have been planted in it to maintain environmental balance.

Gymnasium - Fully equipped with state of the art machinery required for gymnasium purposes. The institute has allowed all the students to exercise in the free exercise school so that they can maintain their health. This is done to maximize the use of these facilities by all the students.

Athletes representing our college from 1977 to till 2024 have won many accolades for our college at National, Khelo India Youth Games and State level. The college successfully organized the Maharashtra State Level Baseball and Netball Championship. Under the Sports Departmental Division and district level competitions were also organized by the college. The institution always supports to ensure that the college sports grounds are always full of sportsmen.

Vision And Misssion

Vision

To advance cutting-edge, sports-specific research, educate current and future sports professionals, improve the physical and emotional lives of current and former athletes, and harness the power of sport to inspire positive social change.

Mission

Through sport we UNITE, CHALLENGE, INSPIRE and INNOVATE.

  • WE EDUCATE current and future professionals in all areas of the sports industry.
  • WE IMPROVE the emotional and physical lives of athletes by advancing cutting-edge sports research and health services.
  • WE INSPIRE social change by promoting the powerful impact of sports and the role of athletes in communities.

Key Features

  • Job opportunities in different Departments through sports quota.
  • Job opportunities in different Departments as a Coach.
  • Fitness Instructor & Trainer.
  • Selection Committee Member.
  • Job opportunities in different Schools & Colleges as a Physical Director and Physical Instructor.

Syllabus

XI Syllabus Pdf XII Syllabus Pdf
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Shri. A.H. Deokar Teacher (Subject Incharge) M.A. , M.Ed.
Mrs. J.A. Udawant Teacher B.C.A. , M.B.A , B.P.Ed.


Department of Environment Education & Water Security


Department Profile

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 (SCF 2010) राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार तयार करण्यात आला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने (SC) शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पर्यावरण शिक्षण (EE) अनिवार्य करण्याचे निर्देश दिले. SC ने दिलेल्या निर्देशांनंतर, Environment Education हा 11वी आणि 12वी इयत्तेत वेगळा आणि अनिवार्य विषय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये पर्यावरणाच्या प्रमुख संकल्पनांचा समावेश आहे जे सहकार्यात्मक शिक्षण आणि समूह क्रियाकलापांना प्रोत्साहन देतात. रचनावादी दृष्टीकोन आणि क्रियाकलापांवर आधारित अध्यापन करण्यात येते. अभ्यासक्रमाच्या आशयाशी संबंधित चित्रांसह ज्ञाननिर्मिती सुलभ करण्यासाठी सामग्री श्रेणीबद्ध पद्धतीने सादर केली गेली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि काळजी, जैवविविधता, नैसर्गिक संसाधने आणि आपत्तींचे व्यवस्थापन यासाठीच्या उपाययोजनांवर विविध कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व सांगितले जाते. शाश्वत विकास समजून घेणे सुलभ करण्यासाठी विषय समाविष्ट केले आहेत. सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक समस्यांच्या परस्परसंवादी प्रक्रिया आणि त्या सोडवण्याचे मार्ग सादर केले आहेत.

विविध विषयांशी संबंधित पर्यावरणीय केस स्टडीचाही विचार केला आहे. अभ्यासक्रमाच्या व्यवहारादरम्यान ते लागू करण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते. अभ्यासक्रम शिकण्याचे मुख्य साधन म्हणून विद्यार्थ्यांच्या क्रियाकलापांवर भर देतो. उच्च माध्यमिक टप्प्यावर, पर्यावरणाच्या दिशेने सक्रिय क्रिया सुरू ठेवण्यासाठी, प्रकल्प आणि सिद्धांत परीक्षा-आधारित मूल्यमापन मोडमध्ये मुख्य अभ्यासक्रम अनिवार्य अभ्यासक्रम मानला जातो,

असा दृष्टिकोन व्यावहारिक पर्यावरणीय समस्या समजून घेण्यास मदत करेल आणि सध्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि योगदान देखील वाढवेल. वेगवेगळे उदाहरणात्मक उपक्रम आणि प्रकल्प कार्य (परंतु मर्यादित नाही) व्यावहारिक पर्यावरणीय समस्यांना एक्सपोजर देतात. प्रकल्प-आधारित शिक्षणामुळे चांगले, संवेदनशील, तर्कशुद्ध नागरिक घडवून आणण्यासाठी शिकण्याची खात्री होईल. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पर्यावरणाप्रती जबाबदारीने समजून घेण्यास आणि कृती करण्यास मदत करेल.

Vision And Mission

  • जाणीवजागृती : सामाजिक गट व व्यक्तीस संपूर्ण पर्यावरण व त्याच्याशी संबंधीत असलेल्या समस्यांचे जाणीव निर्माण करण्यास मदत करणे.
  • ज्ञान : पर्यावरणाशी संबंधित असलेली मुल्ये व्यक्ती व समाज गटाने आत्मसात करावी यासाठी साहाय्य करणे.
  • वर्तन : पर्यावरण सुधारणा, पर्यावरणाचे संरक्षण यात सक्रिय भाग घेण्यास व्यक्ती व समाज गटाचे वर्तन असावे यासाठी त्याला प्रवृत्त करणे.
  • कौशल्य : पर्यावरणाच्या समस्या ओळखणे व त्या सोडविणे याबाबतचे कौशल्य समाजगट व व्यक्तीने संपादित करावे यासाठी मदत करणे.
  • सहभाग : पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी समाज गट व व्यक्तीस सक्रिय भाग घेण्यास संधी उपलब्ध करुन देणे.

Syllabus

XI & XII Syllabus Pdf
Marathi Medium
XI & XII Syllabus Pdf
English Medium
Download Pdf Download Pdf

Teacher Profile

Name of the Teacher Designation Qualification
Mrs. A.R.Patil Teacher (Subject Incharge) M.Sc. , B.Ed.